तुळजापूर : तिर्थक्षेञ तुळजापूरात पोलिस खात्याने शाकंभरी नवराञोत्सवाचा प्रथम दिवसा पासुन म्हणजे ३ जानेवारी २०२० पासुन ते २९ फेब्रुवारी २०२० अखेर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेत आज पर्यत २९०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असुन त्यांच्या कडून ६,२१००० रुपये दंड वसुल केला आहे.
या कालावधीत आरटीओ रजिस्ट्रेशन प्रमाणे कागद पञाची पुर्तता न करणारी अवैध प्रवाशी वाहतुक आणि वन वे घुसलेले वाहने नो पार्कींग मध्ये व रस्त्यावर लावलेली वाहने नंबर प्लेट नसणारे वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. व चोरीच्या गाड्या तिर्थक्षेञ तुळजापूरात घेवुन येणाऱ्यांचे धाबे दणाणून गेले आहेत.
तिर्थक्षेञ तुळजापूरात उपविभागीय पोलिस आधिकारी दिलीप टिपरसे पो.नी. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शन खाली शारदीयनवराञउत्सव प्रथम दिना पासुन म्हणजे 3जानेवारी पासुन तिर्थक्षेञ तुळजापूरात गर्दीच्या रस्त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नो पार्किंग झोन व वन वे वाहतूक सुरु केली आहे सध्या चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश बंद असुन दुचाकी वाहने माञ रस्त्यावर लावले जात आहेत.ही वाहने मुख्य रस्त्यावर लागली जावू नयेत याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
शहरातील शंभर टक्के नाही पण साठ टक्के वाहतुक कोंडी दूर झाली आहे तिर्थक्षेञ तुळजापूर येथील वाहतूक ला शिस्त लावण्यासाठी वाहतुक शाखा प्रमुख अण्णासाहेब कदम, महादेव पाटील, देवबोणे भोसले, वानखेडे म्हेत्रे व भोपळे है पोलिस कर्मचारी दोन शिफ्ट मध्ये काम करीत आहात. यात सकाळी आठ ते राञी दहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ही मंडळी काम करीत आहेत. यासाठी सहा पोलिस कर्मचारी तैनात केले असुन गर्दीच्या दिवशी आणखी कर्मचारी यात वाढ केली जाते आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
