निलंगा/प्रदीप मुरमे – तुळजापूर मतदारसंघाचे भाजपा आ.राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायक बगदूरे यांच्या एका शुभेच्छापर जाहिरातीमध्ये झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले आहे !
आ.राणा जगजितसिंह हे जेष्ठ नेते माजी मंत्री डाॕ.पद्मसिंह पाटील यांचे सुपूत्र होय.मागील लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपामध्ये दाखल झाले.त्यावेळी आ.राणा पाटील देखील राष्ट्रवादी या पक्षाला सोडून भाजपाच्या कंपूमध्ये दाखल झाले.त्यांच्या त्या भाजपा प्रवेशाने राजकीय विश्लेषकांच्या देखील भुवया उंचावल्या होत्या.
त्याला कारण ही तसेच आहे.डाँ.पद्मसिंह पाटील हे लोकसभा निवडणूकीपर्यंत शरद पवार यांचे अत्यंत निकटचे स्नेही,सहकारी म्हणून ओळखले जात.एवढेच नव्हे तर ते त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत.त्यामुळे आ.राणा राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाच्या कमळाला जवळ केल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली होती.त्यानंतर ते भाजपाकडून तुळजापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.परंतु विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झालेल्या पवार- राऊत यांच्या अनपेक्षित अशा धक्कादायक राजकीय खेळीने राज्यात भाजपाचे नव्हे तर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता.घरवापसी करु पाहणाऱ्या त्या आमदारांमध्ये आ.राणा पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.
राणादादा राष्ट्रवादी पक्ष सोडलाच कसा ? असा प्रश्न त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांना भेडसावत होता.पवार कुटूंबियांचे ते अत्यंत निकटचे असल्याने ते भाजपामध्ये रमणार नाहीत.ते लवकरच राष्ट्रवादीमध्ये परत येथील अशी चर्चाही त्यावेळी ऐकावयास येत होती.आजही राष्ट्रवादीच्या जाणकारांकडून पाटील लवकरच राष्ट्रवादीमध्ये परत येतील अशी अटकळ व्यक्त केली जाते.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर आ.पाटील भाजपामध्ये जावून मोठी चूक केली.ते आज राष्ट्रवादीमध्ये राहिले असते तर कॕबिनेट मंत्री राहिले असते अशी चर्चा त्यावेळी ऐकावयास येत होती. आ.पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळातून अधून मधून ऐकू येते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांची अण्णाभाऊ साठे यांची जयंती व ईद या सणानिमित्त नुकतच शुभेच्छापर जाहिरात प्रकाशित झाली.लातूर येथून प्रकाशित होणा-या एका नामांकीत दैनिकामध्ये ती जाहिरात आली आहे.या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे फोटो आहेत.त्या जाहिरातीमध्ये भाजपाचे आमदार असलेल्या आ.राणा पाटील यांचा देखील फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळातील चर्चेला मोठे उधाण आले आहे.
याबाबत बगदूरे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील प्रकार नजरचुकीने झाल्याचे त्यांनी सांगीतले.परंतु या जाहिरातीमुळे आ.राणा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या मागील अनेक दिवसापासूनच्या चर्चेला पुन्हा एकदा नव्याने तोंड फुटले आहे.उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून आ.पाटील यांच्या घरवापसीची मोठी चर्चा रंगते.नुकतच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील भाजपाचे ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.याच दरम्यान राष्ट्रवादीच्या जाहिरातीत आ.राणा पाटील यांचा फोटो झळकल्याने मागील अनेक दिवसापासून ऐकावयास येत असलेली पक्ष प्रवेशाची चर्चा अखेर खरी ठरणार का ? याची उत्सुकता राजकीय गोटात या निमित्ताने शिगेला पोहचली आहे,हे मात्र निश्चित!
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!
चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

