नवी दिल्ली : ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली होती. यासह नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची आशा लागली होती. त्याने भारतीयांची आशा पूर्ण केली. आणि शनिवारी नीरज अंतिम फेरी खेळला आणि त्याने भारताला सुवर्ण पदक मिळून दिले. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला फोन करून त्याचं अभिनंदन केलं होते.
त्यानंतर आता नीरज चोप्राच्या काही जुन्या ट्विटवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटचा फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. खेळाडूंना अभिनंदनासह त्यांचे हक्क मिळवावेत आणि क्रीडा क्षेत्राच्या अर्थसंकल्पात कपात न करायला हवी असे म्हटले आहे. ‘खेळाडूंना अभिनंदनासह त्यांचे हक्क सुद्धा मिळायला हवेत, क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये कपात नाही. फोन कॉलचे व्हिडिओ खूप झाले, आता बक्षीस रक्कम देखील द्या!’ असे राहुल गांधीनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
याच बरोबर राहुल गांधी यांनी काही बातम्यांचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत. यात म्हणण्यात आले आहे, की हरियाणात पूर्वी अनेक ऑलिम्पिक विजेत्यांना बक्षिसांची घोषणा करण्यात आली, मात्र, त्यांना ते देण्यात आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- औषधी भवन जवळील नाल्याचे काम जलदगतीने करा, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या मनपा प्रशासनाला सूचना!
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘जनआर्शिवाद’ यात्रेसाठी निघालेल्या डॉ. भागवत कराडांना बीड जिल्ह्यामध्ये ‘नो एन्ट्री’?
- ‘या’ कारणासाठी घेतली अभिमन्यू पवारांनी गडकरींची भेट
- महाराष्ट्रात सिने स्टाईल अमली पदार्थांची तस्करी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
