मुंबई : इंधनदरवाढीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सर्वसामान्य जनता इंधनदरवाढीमुळे हैराण झाली आहेत. आधीच कोरोना काळात अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. यातच इंधनदरवाढीमुळे सामान्य माणूस अधिकच चिंतेते आहे. मात्र आज सोमवारी नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत.
दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 107.83 रुपये आहे तर डिझेल 97.45 रुपये प्रती लिटर आहे. पुण्यात पेट्रोल 107.10 रुपये, डिझेल 95.54 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये, डिझेल 93.02 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये, डिझेल 94.39 रुपये इतके आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सतत घट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील मंदी कायम राहिल्यास देशातील सामान्य लोकांना निश्चितच इंधनाच्या किंमतींमध्ये थोडा दिलासा मिळू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनातील सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
हत्त्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार
- मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
