🕒 1 min read
मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तर आज देखील पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात काल देखील 35 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 113.12 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर 104.00 रुपये आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर असुन, ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स आहे.
ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 5.15 रुपयांपेक्षाही जास्त दराने महाग झाले आहे, तर डिझेलही जवळपास 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे.
एसएमएसद्वारे तपासा दर-
इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवा.या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्या.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- ‘पुणे मनपा हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा’
- ‘त्या’बद्दल लिहायला तुमच्या हाताला लकवा मारतो का?; पडळकरांचा राऊतांना प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
