मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातून भाजपावर टीकेची भाडीमार केली आहे. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर घणाघात केला आहे. ‘जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात पण तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता,’ असा टोला पडळकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
पुढे गोपिचंद पडळकर म्हणाले, या विषयांवर लिहिताना तुमच्या हाताला लकवा मारतो का?, असा प्रश्नही त्यांनी राऊतांना विचारला आहे. ‘जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते त्यावेळेसे ऐरवी उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. त्यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?, तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय. असेच दिसतेय. अशा प्रश्नांची सरबत्ती पडळकरांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- आंदोलनात मास्क न लावल्याने भाजपच्या माजी आमदारासह १०५ जणांवर गुन्हे
- शेतकऱ्याने शेतात हर्बल गांजा पेरण्याच्या अजब मागणीने प्रशासन चक्रावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
