Share

सामान्यांचे कंबरडे मोडले, मुंबईत पेट्रोलचे दर ८५ रुपयांच्या पार

Published On: 

मुंबई : देशात कोरोना व्हायरसमुळे सध्या तेलांच्या किमती वाढताना दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग तेराव्या दिवशी वाढ झाली आहे. शुक्रवारी 19 जून रोजी पेट्रोलचे दर 0.56 रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर 0.63 रुपयांनी वाढले आहेत.

देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.37 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहेत. तर डीझेलची किंमत वाढून 77.06 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. याचसोबत पेट्रोलच्या किमतीमध्ये 7.11 रुपये आणि डिझेलमध्ये 7.69 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

सत्तेसाठी इतके लाचार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रथमच पहिले – राधाकृष्ण विखे

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोलचे दर 85.21 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 75.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 81.22 रूपये प्रति लिटर आणि 74.77 रूपये एवढे झाले आहेत. तसेच कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे 80.13 रूपये प्रति लिटर आणि 72.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर 80.91 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 73.28 रूपये प्रति लिटरवर गेले आहेत.

‘त्या’ गोंडस चिमुकलीचे काका सापडले आई मात्र बेपत्ता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!