Share

सत्तेसाठी इतके लाचार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रथमच पहिले – राधाकृष्ण विखे

Published On: 

अहमदनगर : विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट मातोश्रीवर भेट घेतली. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चक्क आठवडा उलटून गेला आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता” असं बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.

“विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केलं जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरलं होतं. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक विषय नाही” असं थोरातांनी सांगितलं.

‘त्या’ गोंडस चिमुकलीचे काका सापडले आई मात्र बेपत्ता

दरम्यान, महाआघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार झाले आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांना तेथे कोणीच विचारीत नाही. सत्तेसाठी कॉंग्रसचे एवढे लाचार प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. थोडाफार स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी सत्ता सोडून बाहेर पडावे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली.

शिर्डीत येथे काल व्यावसायिकांच्या बैठकिनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर निषाणा साधला. राज्यात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसबाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका झाली होती. त्याबाबत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेशी बोलून त्यांचा गैरसमज दूर करू, असे थोरात यांनी म्हटले होते. हा धागा पकडून भाजपच्या नेत्यांनी आता कॉंग्रेसला टीकेचे लक्ष्य केले आहे. याबाबत बोलताना काल विखे पाटील यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडविली.

विखे पाटील म्हणाले, की कॉंग्रेसने त्या आग्रलेखाची वाट कशाला पहायची. त्यांचा स्वाभिमान कुठे आहे. महाआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रस नेत्यांना कुणीच विचारत नाही. तरीही ते समाधानाचे नाटक करीत आहेत. आम्ही समाधानी, असे ते म्हणत असतील, तर ते एक तर विनोद करीत असावेत किंवा सत्तेसाठी लाचार झाले असावेत. कॉंग्रसने आता सत्ता सोडावी. मात्र, मात्र कॉंग्रेस नेते तसे करणार नाहीत.

‘पंडित नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी जवानांचे बलिदान सार्थकी लागेल’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!