टीम महारष्ट्र देशा – कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. प्रशासन वारंवार गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहे. मात्र अशाही परिस्थिती काही मुस्लिम धर्मीय नमाज अदा करण्यासाठी मशीदीत जात असल्याचं दिसून आलं आहे. आता मंत्री नवाब मलिक यांनी याच मुस्लिम बांधवांना विनंती केली आहे.
‘माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की कोरोनाचं एवढं भयान संकट जाईपर्यंत आपण घरातच नमाज अदा करावी. शुक्रवारची (जुम्मा) नमाज देखील आपण मशीदीत न जाता आपल्या घरीच अदा करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.’
‘कोरोनापासून आपला बचाव करायचा असेल तर आपण घरातच बसलं पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग खूर गरजेचं बनलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण घराबाहेर पडू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.’
सभी मसलक के उलेमा ने फैसला किया है के लोग मस्जिदों में जाने के बजाए घरों में नमाज़ अदा करें ।
आप सभी मुसलमान भाइयों से गुजारिश है कि आप जुमे की नमाज मस्जिदों या और जगह न अदा कर जोहर घरों में पढ़ें।
आप सभी से गुजारिश है कोरोना वबाई मर्ज से बचाव के लिए ये इक़दाम करें।#कोरोना— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 26, 2020
दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी म्हणून शासन वारंवार आवाहन करत आहे. लोकांच्यामध्ये देखील आता जागरूकता येऊ लागली आहे. काही मुस्लिम धर्मीय आपली जबाबदारी ओळखून नमाज घरीच अदा करत आहेत. मात्र काही मुस्लिम धर्मियांकडून सरकारच्या आदेशाला हरताळ फासला जात होता. आता मलिकांच्या आवाहनानंतर सकारात्मक बदल दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

