आधी छत्रपतींचा पुतळा बुलडोझरने पडण्याचा प्रकार आणि आज कॉंग्रेस शी संबंधित ‘शोदोरी’ मासिकात स्वातंत्रवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह्य लिखाण यामुळे भाजपने आज कॉंग्रेस आणि शिवसेनेवर चांगलीच आगपाखड केली आहे.
या दोन्ही प्रकरणांवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आंनी कॉंग्रेस वर घणाघात केला तसेच छत्रपतींच्या पुतळ्याची पुन्हा स्थापना करावी आणि शिदोरी मासिकावर बंदी घालवी अशी मागणी केली आहे.
आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत कॉंग्रेस वर निशाणा साधला आहे. ते म्हणताय ,’महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची ‘शिदोरी’ आता संपली त्यामुळे स्वा. सावरकरांना बदनाम करणारे गलिच्छ लेखन ते करीत आहेत.’शिदोरी’त अपमान करणाऱ्या या ‘माजोरी काँग्रेसला ,स्वा. सावरकरांचा महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!
महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची "शिदोरी" आता संपली त्यामुळे स्वा. सावरकरांना बदनाम करणारे गलिच्छ लेखन ते करीत आहेत. "शिदोरी"त अपमान करणाऱ्या या "माजोरी” काँग्रेसला ,स्वा. सावरकरांचा महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2020
फडणवीसांनी घेतली पत्रकार परिषद –
यावेळी फडणवीस म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाकडून सातत्याने महापुरूषांचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले असून, एकात त्यांना माफीवीर तर दुसर्यामध्ये चक्क बलात्कारी असे त्यांना संबोधण्यात आले आहे.’
‘मध्यप्रदेशातील घाण महाराष्ट्रात येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. या ताज्या अंकातील लिखाणावर शिवसेना सहमत आहे का? काँग्रेस पक्षाने माफी मागून हे पुस्तक परत घ्यावे किंवा या पुस्तकावर राज्य सरकारने बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने कारवाई केली नाही तर भाजपा आणि राष्ट्रीय हिताला जपणारे लोक तीव्र पाऊले उचलतील. सत्तेसाठी शिवसेना आणखी किती लाचार होणार याचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल. अतिशय खालच्या दर्जाचे हे राजकारण आहे.’
तसेच, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्या मध्यप्रदेश सरकारने तत्काळ माफी मागून ज्याठिकाणी पुतळा होता, त्याच ठिकाणी तो पुनर्स्थापित करावा. शिवछत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना अतिशय तीव्र आहेत, याची सरकारने दखल घ्यावी.’
‘मध्यप्रदेशात शिवरायांचा अपमान, राजस्थानमध्ये वीर सावरकरांचे छायाचित्र काढण्याचा फतवा असे एकापाठोपाठ एक प्रकार होत असताना त्याच काँग्रेस पक्षाला मित्रपक्ष म्हणून स्वीकारणार्या शिवसेनेला याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावेच लागेल.’ असही फडणवीस म्हणाले.
तसेच शिदोरी मासिकात शिवसेनेच्या सावरकरांच्या बाबतीतील भूमिकेवरही टीका करण्यात आल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे. तसेच हे मासिक कॉंग्रेस नी परत घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर बंदी घालावी अशी मागणी कारणार पत्र देणार आहोत असेही ते म्हणाले.
तसेच मध्यप्रदेशातील घाण महाराष्ट्रात येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. आता ही घाण महाराष्ट्रात आली असून यावर शिवसेना रोखठोक भूमिका घेणार की बोटचेपी भूमिका घेणार हे त्यांनी स्पष्ट करावं असं आव्हानही फडणवीसांनी संजय राऊत यांचे नाव न घेता दिलं आहे.
काँग्रेस पक्षाकडून सातत्याने महापुरूषांचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले असून, एकात त्यांना माफीवीर तर दुसर्यामध्ये चक्क बलात्कारी असे त्यांना संबोधण्यात आले आहे. pic.twitter.com/lpKgEyx59b
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 13, 2020
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=7R-vu4aKR2k
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

