जालना: राज्यात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती अनैसर्गिक आहे, आमची तयारी सुरू झालेली आहे. २०२४ च्या निवडणुकीत यांना आम्ही नक्की धडा शिकवू, असा घणाघात केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्यात आरक्षण प्रश्न ज्वलंत झाला आहे. मराठा,ओबसी आरक्षणावरून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. या वरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कोरोनाचे महासंकट तर आहेच त्याची व्यवस्था करण्यात राज्यसरकारने लक्ष घालावे की विरोधकांच्या विरोधाला तोंड द्यावे, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
महाविकास आघाडी सरकारची ही युती जनतेला धोका देवून करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजप ही जनतेच्या मनातली युती होती. उद्धव ठाकरेंनी ती युती तोडली असून जनता याचा बदला २०२४ च्या निवडणुकीत घेतल्या शिवाय राहणार नाही, असा घणाघात रावसाहेब दानवे यांन केला आहे तसेच या साठी आमची तयारी देखील सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘अमित शाहांना पत्र लिहितोय, आता एक-एक नाव समोर येईल’; जरंडेश्वर जप्तीवर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करून जरंडेश्वर कारखाना लाटला; शालिनीताई पाटलांचा गंभीर आरोप
- बाप रे! बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांकाला एका पोस्टसाठी मिळतं एवढे मानधन
- मोठी बातमी : भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट टीममधून 5 खेळाडूंची माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

