🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – दिल्लीच्या जाफराबाद परिसरात २४ फेब्रुवारी भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह ९ पेक्षा अधिकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर असताना देशाची राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर धारेवर धरलं आहे. देशातील जनतेला भाजपकडून विकासाचं मॉडेल अपेक्षित होते. गुजरातचे दंगल मॉडेल नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर तोफ डागली आहे
दिल्लीत जे काही सुरू आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. देशातील जनतेला भाजपकडून विकास मॉडेल अपेक्षित होता, गुजरातचा दंगल मॉडेल नाही. २००२ची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी.#DelhiBurning #DelhiRiots #delhivoilencehttps://t.co/4dPEIlABov
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 25, 2020
अनेक जण दिल्ली हिंसाचारात जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सगळ्यात घडामोडींवर जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
दिल्लीतील हिंसाचाराच्या घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. गुजरातमधील २००२ ची पुनरावृत्ती होवू नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
