टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. या काळात राज्यातील आणि देशातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व सेवा, दुकाने , उद्योग बंद करण्यात आले आहे.
या बंदीचा सर्वात जास्त गैरसोय झालीये ती मद्यप्रेमींची. केंद्र सरकारच्या आदेशामुळे देशातील सर्व दारू विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मद्य प्रेमींना दारू काही मिळत नाहीये. आता तब्बल सव्वा महिना उलटून गेला तरी दारूची दुकाने उघडण्याची काही चिन्ह दिसत नसल्याने मद्यप्रेमी पुरते हवालदील झाले आहेत.
मध्यंतरी काहींनी युट्युब वगैरेवर बघून दारू बनवण्याचा , तसेच गावठी , हातभट्टीची दारू बनवण्याचाही प्रयत्न केला पण पोलिसांनी धाडी टाकून अश्या भट्ट्याही उध्वस्त केल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहे.
थेट विजय मल्ल्यांकडे मागणी –
आता काही मद्यप्रेमींनी थेट मद्य सम्राट विजय मल्ल्या यांच्या ट्वीटरवर जाऊन आम्हाला बियर पोहोच करा अशी विनंती केली आहे. मल्ल्या यांच्या ट्वीटवर त्यांनी बियरच्या बदल्यात कर्ज सेटल करायचीही तयारी केली आहे.
देवेश गौडा म्हणतायेत, सर, किंगफिशर स्ट्रॉंगच्या एक-दोन बॉक्स पाठविण्यासाठी गाझियाबादमध्ये एखादा ओळखीचा डीलर आहे का !! तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम पूर्ण करू, आमच्याकडे कर्जाच्या अनेक तोडण्या केल्या आहेत.
याबरोबरच अनेक मद्यप्रेमींनी मल्ल्या यांच्या काही पोस्टवर बियर पोहचवण्याची मागणी केली आहे.
सर क्या गाजियाबाद में कोई जान पहचान का डीलर है जो किंगफिशर स्ट्रांग की एक- दो पेटी भेज दे!!
आप हमारा काम करवा दो हम आपका काम करवा देंगे, कई लोन सेटेलमेंट करवाए हैं हमने!!— Corruption in edu deptt (@Edu_deptt_Scam) April 25, 2020





दरम्यान देशातील लोकडाऊन ३ मेच्याही पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना तूर्तास तरी काही दिलासा मिळेल अशी चिन्हे नाहीत.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

