अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. त्यात उभी पिके जमीनदोस्त झाली. अशा परिस्थितीत केवळ पंचनामे करून कागदी घोडे नाचविण्यापेक्षा, शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांना लॉकडाउनमध्ये शेतीमाल कवडीमोल भावात विकावा लागला. या संकटावर मात करीत उभी केलेली पिके अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. आता नेहमीप्रमाणे केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, असे कोल्हे म्हणाल्या.
तालुक्यातील खोपडी, लौकी, देहगाव बोलका, पढेगाव, करंजी, खिर्डी गणेश, धोत्रे, आपेगाव, कासली, शिरसगाव, गोधेगाव, भोजडे आदी गावांना अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला. पिकांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची कोल्हे यांनी पाहणी केली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
वन विकासासाठी ‘बाहुबली’चा पुढाकार, केली इतक्या कोटींची मदत
विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड
अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, सभागृहात शिवसेना आक्रमक…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

