मुंबई : बाहुबली चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभासने आता वन विकासासाठी पुढाकार घेतला आहे . त्याने 1650 एकर राखीव वनक्षेत्र दत्तक घेतले. शिवाय या जंगलाच्या विकासासाठी 2 कोटींची मदतही जाहीर केली. त्यामुळे त्यांच्या या वेगळ्या उपक्रमामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रभासने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
‘मी हैदराबादजवळील काझिपल्ली राखीव वनक्षेत्रातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे शहरासाठी एक Lung Space तयार होईल, असा निसर्गप्रेमी या नात्याने मला विश्वास आहे. मी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे आणि वनविभागाचेही मला ही संधी देण्यासाठी मी आभार मानू इच्छितो, असे प्रभासने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
प्रभास अश्या वेग वेगळ्या उपक्रमातून नेहमीच आपल्या चाहत्यांचे मन जिंकत असतो. ‘आदिपुरुष’ हे प्रभासचे आगामी चित्रपट असून तो रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक प्रभासला एका वेगळ्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
कंगनाला मुंबई महापालिकेची नोटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

