सिंधुदुर्ग: अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही समोर आली आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला होता.
यानंतर, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष निर्माण झाला आहे. आता यावर ट्विट करत भाजपाचे नेते निलेश राणेंनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला असून शरद पवार यांच्यावर देखील टीका केली केली आहे. निलेश राणे म्हणतात, ‘ राज्यातील १३०० डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.’
जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला
राज्यातील 1300 डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 20, 2020
तर, देशात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
फडणवीस सरकारने शेतक-यांची फसवणूक करणा-या अनेक कोरड्या घोषणा केल्या व थापा मारल्या’
निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
डोंबिवली एम आय डी सी परीसरातील रस्ते होणार चकाचक; खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
दरम्यान, १८ वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील ५ वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करून देखील अद्याप नोकरीत कायम न केल्यामुळे या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांना मार्च महिन्याचा पगार देखील ५० टक्केच देण्यात आला आहे. एकीकडे केरळातून दीड ते दोन लाख रुपये पगार देऊन डॉक्टरांना आणण्यात येतं आणि इथे काम करणाऱ्यांना ना पगार व्यवस्थित देण्यात येतो ना त्यांना नोकरीत कायम करण्यात येतं. त्यामुळे संपूर्ण आयुष्य अधांतरी चाललं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

