Share

डोंबिवली एम आय डी सी परीसरातील रस्ते होणार चकाचक; खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Published On: 

डोंबिवली- डोंबिवली परीसरातील एमआयडीसी परीसरातील औद्योगिक व रहिवासी विभातील रस्त्यांची गेली काही वर्षे दुर्दशा झाली असून येथील नागरीकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली ५ वर्षे सदर रस्ते व्हावेत म्हणून सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न चालू केले होते. परंतु हे रस्ते पूर्वी कडोंमपात समाविष्ट होते तो आजदे विभाग महापालिकेतून २००३ साली वगळला गेला त्यामुळे सदर रस्ते एमआयडीसी कडे सुपूर्द करण्यात आले. तदनंतर २०१३ साली सदर आजदे विभाग महापालीकेत समाविष्ट केला गेल्यामुळे हे रस्ते परत महापालिकेच्या ताब्ब्यात गेलेे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम एमआयडीसीने करावे का माहापालिकेने करावे हा वाद दोघांमधे चालू झाला.

याबाबत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र स्पष्ट आणी खंबीर भूमिका घेतली, कि आज नागरीकांना यातना सोसाव्या लागत आहेत त्यातून त्यांची सुटका तातडीने व्हायला हवी असा माझा आग्रह आहे त्यामुळे हा वाद निरर्थक असून दोघांनीही या कामासाठी खर्च करावा पण सदर रस्ते तातडीने करावेत अशी भूमिका घेतली…

यादृष्टीने मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मा. पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्योग मंत्री  सुभाष देसाई यांच्याकडे या मागणीच्या पूर्ततेसाठी अनेक वेळा बैठका घेतल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही हि बाब नेवून हे रस्ते करण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे व तसे आदेश द्यावेत असा आग्रह धरला.

मुख्यमंत्र्यांनी दिनांक ६ फेब्रूवारी २०२० रोजी डोंबिवली दौऱ्या दरम्यान सदर रस्त्यांची पहाणी केली व कडोंमपा व एम आयडीसी यांनी ५०%/५०% खर्च करावा असा आदेश दिला. त्यानुसार सदर रस्त्याच्या खर्चाचा अंदाजे खर्च (DPR) तयार करून सुमारे ११० कोटी रुपयांच्या प्रस्तावास एमआयडीसी ने मंजूरी दिली असून सदर रस्ता व त्याच्या दुतर्फा गटारे यांच्या कामाचा खर्च महापालिका व एमआयडीसी यांनी ५०%/ ५०% उचलावा असे ठरवण्यात आले असून सदर काम एमआयडीसी कडून लवकरच चालू करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’

…तर विरोधकांनी काहीही न खाता-पिता मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं – सुधीर मुनगंटीवार

गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी

कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!