Share

बंगाल निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात नाही तर स्पष्ट हात होता; भुजबळांचा दावा

Published On: 

नाशिक : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ममतादीदींच्या विजयासाठी अदृश्य हात काम करत होते, असा दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडले. त्यामुळे मतविभागणी रोखली गेली. आणि त्याचा फटका भाजपला बसला. एकप्रकारे त्यांचे अदृश्य हात ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी काम करत होते.’ असं विधान भाजप नेत्यानेच केल्यामुळे सध्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘बंगाल निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा केवळ अदृश्य हातच नाही तर स्पष्ट हात होता,’ असा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच, पवारांनी ममता बॅनर्जी यांना मदत केली हे जगजाहीर आहे, असं देखील भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!