नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर येत्या ६ ऑगस्टपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी हे आदेश दिलेत. भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या विनंतीवरून ही तारीख दिली.
गडकरींनी उमेदवारी अर्जात त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत कृषी दाखवले असून प्रत्यक्षात त्यांच्याकडे शेती नाही, गडकरींनी त्यांच्या वडिलांचे नावही चुकीचे लिहिले आहे. अनेक त्रुटी असतानाही निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज स्वीकारल्याचे याचिकेत म्हटले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गडकरी यांनी या याचिकेतील अनावश्यक व आधारहीन मुद्दे वगळण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सहाव्या ऑर्डरमधील नियम १६ अंतर्गत आणि ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. ते अर्जदेखील पुढील सुनावणीत विचारात घेतले जातील.
महत्वाच्या बातम्या
- ‘मागण्या मान्य होत नसतील तर राज्यात पुन्हा आंदोलन सुरू करणार’, संभाजीराजेंचा इशारा
- सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची
- संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार ? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
- जुलै महिन्यात ११ दिवस विविध राज्यांत बँक राहणार बंद
- नवख्या इंग्लंडपुढे पाकिस्तानचे लोटांगण! ९ गडी राखुन दणदणीत पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

