औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतील रिक्त जागेसाठी माजी मंत्री फौजिया खान यांना उमेदवारी दिली. या निर्णयाबद्दल खान यांनी समाधान व्यक्त केले. पक्षासाठी नेहमी कार्यरत राहिले. पक्षाने कामाची योग्य दखल घेतली, असे खान म्हणाल्या. मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय योग्य आहे. यापूर्वी आघाडी सरकारने विधेयक मंजूर केले होते, असे खान म्हणाल्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांची राज्यसभेवर निवड होत आहे. याअनुषंगाने महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. आपण विरोधी पक्षात असताना त्यांनी सतत महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. आता त्यांच्या माध्यमातून आपला आवाज संसदेत घुमेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान,महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होत्या. राष्ट्रवादी भवनात त्यांनी इच्छुक महिला उमेदवारांशी चर्चा केली. तसेच मेळाव्यात आगामी राजकीय आणि सामाजिक उपक्रमांवर मार्गदर्शन केले. यावेळी फौजिया खान, महिला शहराध्यक्ष मेहराज पटेल, छाया जंगले, प्रतिभा वैद्य, वीणा खरे, वंदना चौधरी, अश्विनी बांगर, मंजूषा पवार उपस्थित होत्या.
शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी प्रथमच राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार आहे.त्यामुळे शरद पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जातोय… महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपतोय.. चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असून दोन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. या सातही जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होतेय.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

