Share

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर परभणी शिवसेना आक्रमक, खासदारांची आंदोलनाची भूमीका

Published On: 

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ मंजूर करीत कार्यान्वित करावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आता निर्णायक लढाई लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहे. या नंतरही या प्रकरणी निर्णय झाला नाही, तर सात सप्टेंबर पासून उपोषण करण्याचा इशाराही खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.

या संदर्भात खासदार जाधव यांनी त्यांची भूमीका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य विभागाचे सचिव यांच्या गाठीभेटी घेतल्या. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ स्थापन करावे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली. दरम्यान या प्रश्नावरच २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविणार आहोत. एक ते सहा सप्टेंबर या दरम्यान या मागणीसाठी आंदोलने केली जाणार आहेत. विशेषतः धरणे, निदर्शने तसेच रास्ता रोको आंदोलन केले जाईल. याउपरही राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास सात सप्टेंबर पासून आपण उपोषण सुरू करू.’

परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेने देखील पाठपुरावा केला होता. मात्र, आता राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदारच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या आक्रमक भूमीकेला पालकमंत्री नवाब मलिक यांच्यासोबत असलेल्या वादाची किनारही आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!