Share

परभणी : प्लॅस्टिकमुक्तीसाठी तरुणाचा बुलेट प्रवास

Published On: 

परभणी: लायन्स क्लब प्रिन्सचे सदस्य शैलेश कुलकर्णी हा तरुण प्लॅस्टिकमुक्तीसाठी भारतासह भूतान, नेपाळदरम्यान बुलेट प्रवासासाठी सज्ज झाला आहे. ‘से नो टू सिंगल प्लॅस्टिक यूज’ हा सामाजिक संदेश देत तो हा प्रवास करणार आहे.

शैलेश कुलकर्णी याच्या या आंतरराष्ट्रीय बाईक राईडची सुरवात बुधवारपासून (ता.30) परभणी शहरातून झाली. पुढील 15 दिवस जवळपास सात हजार किलोमीटरचा प्रवास तो बुलेटवरून करणार आहे.

या प्रवासादरम्यान तो ठिकठिकाणी प्लॅस्टिक वापरू नका’ हा सामाजिक संदेश देणार आहे. शैलेश परभणीतून नांदेड, वरोरा, नागपूर, सागर, झाशी, कानपूर, लखनौ, भीमदत्ता, पोखरा, काठमांडू, नेपाळ, सिलीगुडी, गंगटोक, पेंटशोलिंग, पारो, थिंपू, भूतानला जाणार आहे. त्यानंतर तो सिलीगुडीमार्गे कोलकता, भुवनेश्वर, रायपूर, नागपूर, अमरावती, वाशीम, हिंगोलीमार्गे परत परभणीत येणार आहे.

त्याला शुभेच्छा देण्यासाठी लायन्स क्लबचे सदस्य संतोष नारवाणी, डॉ. प्रवीण धाडवे, राहुल सचदेव, मनोहर चौधरी, रितेश जैन, विजय दराडे, रोहित गर्जे, झेड. आर. मुथा, श्रीकांत मनियार, प्रवीण मुदगलकर, अवी टाक, सचिन अग्रवाल यांच्यासह शैलेश कुलकर्णीचा परिवार उपस्थित होता.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190220383066050560?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190218691155070976?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!