Share

परमबीर सिंह फरार? सीआयडीकडून शोध सुरू

Published On: 

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी समोर आल्या होत्या. दरम्यान राज्य सरकारने सुरु केलेल्या चौकशीविरोधात परमबीर सिंग यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच त्यांना केंद्रीय लवादाकडे जाण्याचा पर्याय असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे सीआयडीने परमबीर सिंग यांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे सिंग फरार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चांदीवाल आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे सीआयडीने सिंग यांचा शोध सुरु केला आहे. परमबीर सिंग चंदीगडच्या घरीही सापडलेले नाहीत. त्यामुळे आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर यावरूनच अनिल देशमुखप्रमाणे परमबीर सिंगही फरार झाल्याची टीका भाजपकडून राज्य सरकारवर केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!