नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्धची मालिका रद्द केली आहे. हा दौरा रद्द करण्याचा निर्णय तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वीच घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मैदानावर उतरण्यास नकार देत दौरा रद्द करण्याची घोषणा केली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे प्रमुख रमीज रजा हे न्यूझीलंडच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. त्यांनी आता आयसीसीपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला आयसीसीसमोर येण्यास तयार राहायला सांगितले आहे.
Crazy day it has been! Feel so sorry for the fans and our players. Walking out of the tour by taking a unilateral approach on a security threat is very frustrating. Especially when it’s not shared!! Which world is NZ living in??NZ will hear us at ICC.
— Ramiz Raja (@iramizraja) September 17, 2021
रमीज यांनी ट्विटरवर लिहिले, ‘हा एक विचित्र दिवस आहे, मला माझ्या खेळाडू आणि चाहत्यांसाठी खूप वाईट वाटते. अशाप्रकारे, सुरक्षेच्या धोक्याबद्दल एकतर्फी चिंता व्यक्त करत मालिकेतून माघार घेणे अत्यंत निराशाजनक पाऊल आहे. न्यूझीलंड संघ कोणत्या जगात राहतो? आता न्यूझीलंड संघाने आयसीसीसमोर आमचे बोलणे ऐकायला तयार व्हावे.
न्यूझीलंड संघ 17 सप्टेंबर ते शुक्रवार ते 3 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार होता. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा दौरा कालपासून सुरू होणार होता, जो सुरक्षेच्या कारणामुळे काही तास आधी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकदिवसीय सामन्यानंतर न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेतही खेळावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरडी कोसळण्याच्या जागांचा शोध घेण्यासाठी नव्या समितीचे कागदी घोडे नाचवू नका’
- ‘अजितदादा पवार हे केवळ शब्द देणारे, आश्वासन देणारे नेते नसून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेते आहेत’
- अनैतिक मानवी व्यापाराला पायबंद घालणार; महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची ग्वाही
- ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन
- साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

