परळी : शहरी भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे परळी शहरात दीड हजार महिला बचत गटांची स्थापना करण्यात येणार आहेत. अशी माहिती खा. प्रीतम मुंडे यांनी दिली आहे. परळी शहरातील महिलांशी मुक्त संवाद साधत त्यांनी मार्गदर्शन केले.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील महिला स्वयंसिद्ध व आर्थिकरित्या सक्षम झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतुन महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना महिला बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून वाड्यावस्तीवरील बचत गटांच्या महिलांना विदेशात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तसेच बचत गटांच्या उत्पादनांची विदेशात मागणी वाढली आहे. परिणामी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होते आहे. अस मत यावेळी प्रीतम मुंडे यांनी मांडले.
परळी शहरातील महिलांना सक्षम करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड हजार बचत गट स्थापन करण्यात येणार आहे. परळी शहरातील महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनात सदैव पाठीशी राहू असा विश्वास याप्रसंगी उपस्थित महिलांना प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
