परळी : आज परळी ग्रामीण रुग्णालयात हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंना प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण पालकमंत्री पंकजा मुंडे व खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना जिल्ह्यातच पासपोर्ट उपलब्ध व्हावे याकरिता केलेल्या प्रयत्नांमुळे बीड येथे पासपोर्ट कार्यालय सुरु झाले आहे.
तसेच यापूर्वी परळी येथून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना लसीकरण करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागत असे. परळी ग्रामीण रुग्णालयात हज यात्रेकरूंसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण कक्षाची स्थापना करून यात्रेकरूंना ही सुविधा परळी रुग्णालयात उपलब्ध करून दिली आहे .आज या कक्षाचे उदघाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

