रोहित गिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी पाच वर्षानंतर आता महाराष्ट्राला पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, भाजपा प्रणीत एनडीएने दणदणीत बहुमत मिळवत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी कालच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजपच्या, पहिल्या फळीतील नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि येणारी विधानसभा याबद्दल खलबत झालं असं सूत्रांनी सांगितलं.
राज्यात भाजप, शिवसेना युती होण्याचे चिन्ह असले तरीही , मुख्यमंत्री पदावरून घोडं आडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच अमित शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार म्हणत, आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यातच शिवसेनेची काय भूमिका असणार यावर युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या कन्या आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा असा एकंदरीत सूर २०१४ च्या विधानसभेत पाहायला मिळाला होता. गोपीनाथ मुंडे स्वर्गवासी झाल्यानंतरची ती पहिलीच निवडणूक होती. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले गोपिनाथरावांच्या अकाली जाण्याने, मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. आणि नवख्या असणाऱ्या पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं.
आता पुन्हा विधानसभेचे पडघम वाजू लागले असतानाच, पंकज मुंडे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करण्याची शक्यता आहे. महारष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र राज्याला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही. त्यामुळे पंकज मुंडे यांचे नाव पक्षाध्यक्ष अमित शहा पुढे करू शकतात. कुठल्याही परीस्थितीत सत्ता काबीज करणे हे भाजपाचे ध्येय आहे. त्यासाठी असाही प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. युपीए च्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याकडे महिला मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणून पाहिलं जायचं. मात्र, आता त्याचं नाव मागे पडून पंकजा मुंडे याचं नाव आघाडीवर आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा भाजपचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा असणार का या मुद्द्याची चर्चा सुरु असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले होते. स्वर्गीय केंद्रीय मंत्री आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथगड येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. त्याच बीडमधील परळी विधानसभेच पंकजा मुंडे प्रतिनिधित्व करतात. आपले चुलत भाऊ आणि महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या त्या कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जातात. विधानसभेत धनंजय मुंडे यांचा त्यांनी पराभव करत विजय मिळवला होता. पंकजा मुंडे ह्या भाजपच्या स्टार प्रचारक आणि पाहिल्या फळीतल्या नेत्या आहेत. त्याचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी चर्चिलं जात आहे. आता, पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? हे येणाऱ्या काळातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर अवलंबून असणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

