नवी दिल्ली : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीसह राजकारणाबाबतही चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना स्थान मिळण्याचं निश्चित झालं आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे, अशीही माहिती आहे.
अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई करू;मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक
जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची २० जानेवारी रोजी सूत्रे स्वीकारली होती. नव्या अध्यक्षाबरोबरच नवी कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि लॉकडाऊन यामुळे ही कार्यकारिणी लांबली होती. मात्र, येत्या ८ ते १० दिवसात ही नवी कार्याकारिणी अस्तित्वात येण्यार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळालं आहे. मात्र पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर कोणती जबाबदारी देण्यात येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जितेंद्र आव्हाडांचा कौतुकास्पद निर्णय, कोरोना रुग्णांसाठी करणार ‘प्लाझ्मा दान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

