टीम महाराष्ट्र देशा : पक्ष जी जबबदारी देईल ती स्वीकारायला मी तयार आहे, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदावर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्यचे बोलले जात होते. यासंदर्भात त्यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काल पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली पंतप्रधान मोदी यांच्या सोबत राज्याच्या ७ खासदारांनी मंत्रीपादाची शपथ घेतली. त्यामध्ये राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही वर्णी लागली. त्यामुळे आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद कोणाला दिले जाणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. याचदरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, तसेच महसूल मंत्री चंद्रकात पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे.
दरम्यान या संदर्भात पंकज मुंडे यांना माध्यमांनी विचारले असता, पक्ष जी जबबदारी देईल ती स्वीकारायला मी तयार आहे. असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावरून पक्षाने जर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर त्या स्वीकारायला तयार असल्याचे दिसून येते. याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

