मुंबई : उसतोड कामगारांना न्याय मिळवण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करून ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवण्याची विनंती केली आहे.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योग अडचणीत आले आहेत. साखर कारखान्यांवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार व मुकादमांना आर्थिक संकटांशी सामना करावा लागत आहे, या प्रश्नांवर लढण्यासाठी पंकजा मुंडे या सक्रीय झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नाराज असणाऱ्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय होत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पेव फुटले आहे.
मुहूर्त ठरला, राज्यसेवा परीक्षांच्या तारखा जाहीर
‘ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे.’ अस पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
कोयत्याला मिळेल न्याय; ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा. खा.शरद पवार साहेब, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार.@PawarSpeaks @Jayant_R_Patil
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 6, 2020
माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ नेते मा.खा.शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटीलजी, साखर संघाचे अध्यक्ष मा.जयप्रकाश दांडेगावकरजी यांच्याशी चर्चा करणार आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2020
त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

