टीम महाराष्ट्र देशा : शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. परळीकरांची तहान भागवण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शहराच्या विविध भागात बोअर घेऊन दिले. परंतु नगर परिषद ताब्यात असलेली राष्ट्रवादी पाणी वाटपात भेदभाव करत आहे. शत्रूलाही पाणी पाजण्याची परंपरा आपल्या संस्कृतीची आहे. परंतु राष्ट्रवादीकडून पाणी वाटपात होणारा दुजाभाव बघता येणाऱ्या काळात पाणी वाटपात भेदभाव करणारांना पाणी पाजवू असा विश्वास ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
परळी शहरातील माणिक नगर , शिवाजी नगर भागातील विशेष रस्ता अनुदान निधी अंतर्गत दिलेल्या पाच कोटी रुपयांपैकी १८.७४ लक्ष रुपयांच्या रस्त्यांचे लोकार्पण पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंकजा मुंडे बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान समृद्ध होत आहे. रस्ते ,पाणी पुरवठा ,महिला बचत गट अशा अनेक योजना ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणारे कार्य सत्तेच्या माध्यमातून केले आहे. परळी नगर परिषद आमच्या ताब्यात नाही. नगर परिषद माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हवी होती. ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यात नगर परिषद आहे त्यांनी पाणी पुरवठा योजनेचा बट्याबोळ केला असून भ्रष्टाचार करण्याची कला राष्ट्रवादीकडे असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

