Share

परळीत परिवर्तन यात्रेचा समारोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मीच समारोप करणार – पंकजा मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गोपीनाथ मुंडेंनी ज्यांना राजकारणातून हद्दपार केलं होतं, त्याच लोकांनी उद्या परळीत परिवर्तन सभेचा समारोप ठेवला आहे. खरंतर त्यांच्या परळीतील नेत्याने यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला हवा होता, परंतु समारोप ठेवला आहे. त्याच दिवशी आम्ही इथे येणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केला आहे.

दरम्यान, राज्यभर सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप शरद पवारांच्या उपस्थितीत येत्या 23 तारखेला परळीत होणार आहे. यावर निशाणा साधताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. दिंद्रुड इथे आयोजित पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना १ कोटी ६८ लाख आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेतील ९३ लाख रुपयांच्या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या नेत्यांन चांगलच फैलावर घेतल.

राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे 70 वर्षाचं खरकटं आम्ही काढलं, खंडणीखोर आणि गुन्हेगारी मुंडें साहेबांनी संपवली. आता राष्ट्रवादीने फक्त कार्यकर्ते पोसले आणि आता यात्रा काढत आहेत. गळे काढणारे काय हल्ला करणार असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली. तसंच परळीत राष्ट्रवादीचे लोक पार्टी देऊन निवडून येतात, असंही त्या म्हणाल्या

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=628s

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!