Share

…म्हणून पांड्या आणि राहुलला बीसीसीआय ने ठोठावला प्रत्येकी २० लाखांचा दंड !

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बीसीसीआयच्या लोकपालांनी  हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलशिक्षा अजब शिक्षा सुनावली आहे. हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी ‘कॉफी विथ करण 6′ या कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य केलं होतं.

कॉफी विथ करण 6’ या कार्यक्रमात महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर लोकपाल डी के जैन यांनी सुनावलेल्या शिक्षेनुसार दोघांनाही शहीद जवानांच्या १०  कुटुंबांना प्रत्येकी एक लाख आणि अंध क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी १०  लाखांचा निधी देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत त्यांना देण्यात आली आहे.

पांड्या व राहुल यांनी दिलेल्या मुदतीत ही रक्कम न भरल्यास बीसीसीआय त्यांच्या मॅच फीमधून ती रक्कम वजा करेल, अशा सूचनाही लोकपालांनी दिल्या आहेत.

काय होते ते वादग्रस्त विधान ?

करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?
हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).”
कुटुंबीयही किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,”एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ”
करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?
लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडू
हार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.

https://www.youtube.com/watch?v=D2MD8Lpilao

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!