अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पुण्यात एका वृत्तवाहीनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे काल निधन झाले. यावरून आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे. आघाडी सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नसल्याने सामान्यांचे आरोग्य धोक्यात दिसते. सामान्य माणसाला कोणत्याही आरोग्य सुविधा मिळत नसल्याने, सामान्य माणसाला वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन हा शासकीय अनास्थेचाच बळी आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
विखे पाटील म्हणाले की, शासकीय यंत्रणेने पांडुरंग यांना उपचाराबाबत योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले नाही. पुण्यात त्यांना रुग्णवाहिका मिळू नये, ही शासनव्यवस्थेची शोकांतिका आहे. कोरोना संकटात आघाडी सरकारने केवळ मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात सामान्यांना आरोग्यसुविधा मिळत नाहीत, असे आ.विखे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाची लागण
पांडुरंगकडे विविध विषयांची मांडणी करण्याची हातोटी होती. दुर्दैवाने समाजासाठी धावणाऱ्या पत्रकारालाच उपचार मिळू नयेत, हे अतिशय दुःखद आहे. पांडुरंग यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, असे आ.विखे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचे वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सकडून बिटकॉइनची मागणी


