🕒 1 min read
मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत असताना सुपरहिरो शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुकेश खन्ना यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ७० वर्षांपासून देशात हेच सुरु आहे त्यावेळी नेहरूंनी शहरीकरणाला महत्व दिलं नसतं तर आज देशाची ही अवस्था नसती, असे खन्ना यांनी म्हटले आहे.
मुकेश खन्ना यांनी एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. ते म्हणाले की, लोकांना वाटतं मी भाजपा पाठिंबा देतोय पण हे खोटं आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. गेल्या ७० वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. अन् याला आपल्या देशाचं धोरण जबाबदार आहे. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिलं. त्याऐवजी त्यांनी खेड्यांना सक्षम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. देशातील ७५ टक्के भाग खेडी आणि गावांनी व्यापला आहे. आपण त्यांच्या विकास करायला हवा, असे खन्ना म्हणाले.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- आमची आघाडी भक्कम असून सरकार किमान समान कार्यक्रमानुसाच काम करत आहे : कॉंग्रेस
- घाबरू नका ! कोरोनाचा नवा प्रकार अनियंत्रित झालेला नाही; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
- ‘पहिले मंदिर फिर सरकार’असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदललीय’
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे : राष्ट्रवादी
- एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा : आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

