🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टीकडून श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंवर आरोप ठेवला आहे. इतिहास साक्षी आहे, देशभरातून मागणी होत असतानाही, मुखर्जी यांच्या मृत्युची चौकशी करण्याचे आदेश देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले नाहीत, असे नड्डा यांनी म्हटले आहे.
BJP Working President JP Nadda: The whole country demanded an inquiry into Dr. #ShyamaPrasadMukherjee's death, but Pandit Nehru did not order an inquiry. History is witness to this. Dr.Mukherjee's sacrifice will never go in vain, BJP is committed to this cause pic.twitter.com/fKh107sepf
— ANI (@ANI) June 23, 2019
यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले की, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यांच्या जीवनात जे कार्य केले, ते तत्कालीन परिस्थिती पाहता खूप मोठे आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच, आज पश्चिम बंगाल आणि काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहेत. देश श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान कधीही विसरणार नाही. तसेच, इतिहास साक्षीदार आहे. श्यामाप्रसाद यांच्या मृत्युच्या चौकशीची मागणी देशभरातून होत होती. मात्र, पंडित नेहरुंनी या चौकशीचे आदेश दिले नाहीत, असे नड्डा यांनी म्हटले.
दरम्यान देशाची एकता आणि अखंडता यासाठी मुखर्जी यांनी आपले आयुष्य वेचले. शक्तिशाली आणि अखंड भारतासाठी त्यांचे असलेले विचार नेहमीच आम्हाला प्रेरण देत राहतील. महान देशभक्त श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदान दिनानिमित्त आदरपूर्वक आदरांजली, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
