Share

‘ती’ जागा आयुक्त पांडेय यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विकली; आंबेडकरवादी समितीचा आरोप!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कार्यालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आमखास मैदानालगत कार्यालय विकसित करण्यात आले आहे. ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना आता वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी (दि. ४) डॉ. आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन ही जागा प्रशासक आस्तिकुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विक्री केल्याचा आरोप केला.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाचे काम महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राशेजारी असलेल्या कार्यालयातून सुरू आहे. या कार्यालयापासून जवळच असलेल्या मात्र अनेक वर्षांपासून पडून असलेल्या अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय वसतिगृहाच्या जागेचा वापर स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

असे असताना या जागेवर पूर्वी वक्फ बोर्डाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर मंगळवारी डॉ. आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन ही जागा प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक गौतम खरात, मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पूर्वीप्रमाणे वसतिगृह सुरू करावे, अन्यथा उच्च न्यायालय, मुख्यमंत्री, पालकमंत्री, समाजकल्याण मंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचे कृती समितीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!