Share

पद्मावतीला मध्यप्रदेशात नो एन्ट्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – पद्मावती सिनेमाला अगोदर राजपूत करणी सेनेचा विरोध होता. मात्र आता या विरोधाला राजकीय स्वरुप प्राप्त झालं आहे. कारण मध्य प्रदेशात सिनेमा रिलीज केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही सिनेमा रिलीज होऊ देऊ नये, अशी मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र तरीही संजय लीला भन्साळी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

सिनेमा कल्पनांवर आधारित असेल तर ठीक. मात्र थोर व्यक्तींवर सिनेमा बनत असेल तर इतिहासामध्ये छेडछाड होता कामा नये. संपूर्ण देशाला वाटतंय, की सिनेमाद्वारे इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे. हा सिनेमा मध्य प्रदेशात रिलीज होऊ देणार नाही, असं शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पद्मावती सिनेमावरुन दिग्दर्शक संजय लिला भन्साळींना धमक्या दिल्या जात आहेत. चित्रिकरणावेळी सिनेमाच्या सेट्सवरही हल्ला करण्यात आला आहे. करणी सेनेने पद्मावतीला समर्थन देणाऱ्या आणि पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाचं नाक कापण्याचीही धमकी दिली होती. तसंच तर काही संघटनांनी प्रेक्षकांना सिनेमाचं तिकीट काढण्यापूर्वी विमा काढून ठेवण्याचीही धमकी दिली होती.

दरम्यान पद्मावतीच्या सर्व वादानंतरही निर्मात्यांनी दोन संपादकांसाठी खास मीडिया स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. दोघांनीही या सिनेमात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगितलं. यावरुनही सेन्सॉर बोर्डाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसंच सिनेमाची कागदपत्र अपूर्ण असल्याचं कारण देत सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी परत पाठवली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!