Share

‘पढो परदेश’ अंतर्गत महाराष्ट्रातील २३४ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ

Published On: 

नवी दिल्ली : अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावर सूट देणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘पढो परदेश’ योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षण, एमफील व पीएचडी हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने ‘पढो परदेश’ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्ष २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरातील ३६ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३ हजार ६८७ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी आणि शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवान मुला-मुलींना ‘पढो परदेश’ योजनेंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. राज्यात जैन समाजातील सर्वात जास्त ९९ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुस्लिम समाजातील ५३, ख्रिश्चन समाजातील ४४, शीख समाजातील २३, बौद्ध समाजातील ९ तर पारसी समाजातील ६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!