Share

पडळकरांचा शब्दप्रयोग १०० टक्के चुकीचा, भाजपने हाथ झटकले

Published On: 

पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘पडळकरांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न न करता देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही हे पहावं’

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे. अस पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत.

पोंक्षे राष्ट्रवादीच्या स्टेजवर; ’आप’ने दिली आंबेडकरांचा आणि गांधीजींचा अवमान केल्याची आठवण करून

‘पडळकर यांनी शरद पवारांविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजप असहमत नाही, पण त्यांनी जो शब्दप्रयोग वापरला, तो १०० टक्के चूक आहे. भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांच्या राजकीय धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत. आम्ही त्यांच्यावर टीका केली आणि यापुढेही करू, पण सार्वजनिक जीवनात असताना, कोणावरही अशी टीका करणं ही भाजपची परंपरा नाही,’ असं भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

दुसरीकडे ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्यावर टीका करताना काळजी घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!