Share

पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद

Published On: 

🕒 1 min read

नानजिंग (चीन) : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसा खेळ करायला हवा, याचा उत्तम नमुना स्पेनच्या कॅरोलिन मरिनने दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले. मरीनने उपांत्य फेरीत भारताच्याच सायना नेहवाल हिला पराभूत केले होते.

पहिल्या गेममध्ये विजयासाठी मरीनला सिंधूने चांगलेच झुंजवले. सिंधूने सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर गेम अत्यंत अटीतटीचा झाला. मरीनने आपला झुंजार खेळ दाखवत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू सपशेल अपयशी ठरली. तिने तो गेम तब्बल ११ गुणांच्या फरकाने गमावला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सिंधूने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या सामन्यापूर्वी सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये 12 सामने झाले होते. या दोघींनीही 12 पैकी प्रत्येकी सहा सामने जिंकले होते.

धुळ्यात मराठा आंदोलनास हिंसक वळण ; हिना गावित यांच्या वाहनांची तोडफोड

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे मला मान्य नाहीत – आंबेडकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!