Share

धक्कादायक : भारतात ७० टक्के गरिबांकडील संपत्तीच्या चौपट धन एक टक्का अब्जाधीशांकडे

Published On: 

नवी दिल्ली : भारतातील 63 अब्जाधीशांकडे देशाच्या एकूण अर्थसंल्पापेक्षाही जास्त मालमत्ता आहे. २०१८-१९ मध्ये भारताचा अर्थसंकल्प २४ लाख ४२ हजार २०० कोटी रुपये होता. भारतातील या १ टक्के अब्जाधीशांकडे देशातील ७०% गरीब लोकसंख्या म्हणजे ९५.३ कोटी लोकांच्या एकूण मालमत्तेच्या चौपट संपत्ती आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम(डब्ल्यूईएफ)च्या ५० व्या वार्षिक बैठकीआधी जारी करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) वार्षीक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ऑक्फॅमने टाइम टू केअर हा अहवाल प्रकाशित केला. त्यात जगातील 2 हजार 153 अब्जोपतींकडे पृथ्वीवरील 60 टक्के लोकांपेक्षा अधिक संपत्ती आहे. हा अहवाल असमानतेच्या धक्क्यांनी व्यापलेला आहे.

जागतिक पातळीवर असमानतेचे प्रमाण प्रचंड आहे, गेल्या दशकामध्ये अब्जोपतींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी असमानता दूर करणारी धोरणे आणल्याविना दूर करता येणे शक्य नाही, केवळ काही सरकारेच त्यासाठी बांधिलकी दर्शवीत आहेत, असे ऑक्सफॅमचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहार यांनी म्हटले आहे

दावोसमध्ये सुरू होणाऱ्या ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या पूर्वसंध्येला ‘ऑक्सफॅम’ने सादर केलेल्या अहवालात जगातील २,१५३ अब्जाधीशांकडे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के लोकसंख्येच्या तुलनेत अधिक संपत्ती असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

जगभरात मोठ्या प्रमाणात संपत्तीचे असमान वितरण वेगाने वाढत असल्याचेही निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. श्रीमंतांच्या श्रीमंत होण्याचा वेगही वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या दशकभरात अब्जाधीशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षी (२०१९) त्यांच्या एकूण संपत्तीत घसरण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जगभरातील संपत्तीचे आकडे चिंताजनक असून, गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या संपत्तीचा ८२ टक्के हिस्सा केवळ एक टक्का लोकांकडे साठला आहे. जगभरातील सर्वाधिक गरीब ३.७ अब्ज लोकसंख्येच्या संपत्तीत मात्र कोणतीही भर पडलेली नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!