Share

अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिर प्रवेश करु,राज ठाकरेंचा इशारा

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रात भाजप,वंचित,एम आय एम नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिर उघडण्यासाठीच्या आंदोलनात उडी मारली आहे. सरकारने लवकरात लवकर नियमावली आखून मंदीरं सुरू केली नाही तर आम्ही सरकारचा आदेश झुगारून मंदीरांमध्ये प्रवेश करु असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.दैनंदिन व्यवहारात सरकार सुट देत असताना सरकारने मंदीरंच का बंद ठेवली आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

सरकारच्या डोक्यावर गुंगीची झापड आल्याने त्यांना हिंदू भाविकांचा कंठशोष दिसत नसल्याची टिका अशी टिका राज ठाकरे यांनी केली. मंदिर हा भक्ती पुरता मर्यादित विषय नाही यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मॉल व इतर व्यवहार ज्या पद्धतीने सरकारने नियमं लावून उघडली आहेत. त्याच धर्तीवरती मंदीरांबाबत नियमं लावा आणि मंदिरं उघडा नाही तर आदेश झुगारुन मंदिरांंमध्ये प्रवेश करु अस राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

पांडुरंग रायकर शासकीय अनास्थेचा बळी:- राधाकृष्ण विखे

आधीच महाराष्ट्रात मंदीर उघडण्यावरुन राजकारण तापलेलं असताना आता राज ठाकरे यांनी मंदीरांबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने आता या मागणीला जोर आला आहे. आता राज्य सरकार या मागणीला कशा पद्धतीने लागू करतं हे बघणं फार महत्त्वाचं आहे.

पंतप्रधान मोदी यांचे वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सकडून बिटकॉइनची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!