अमरावती : महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजना महिला व बालविकास विभागाकडून अंमलात आली आहे. अमरावती, पुणे, सोलापूर, पालघर, मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत कुटुंबाने बालकांचा तात्पुरत्या स्वरूपात सांभाळ करणे अपेक्षित आहे. या मुलांच्या संगोपनासाठी प्रतीपालकत्व पालकांना दरमहा दोन हजार रुपए देण्यात येणार आहे.
योजनेत प्रत्येक जिल्ह्यात चाळीस मुलांची निवड करण्यात येणार आहे. अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके दुसरे मोठे कार्य नाही. त्यामुळे प्रतीपालकत्व योजना महत्वपूर्ण आहे. मुलांना फॉस्टर केअरच्या माध्यमातून घर मिळवून दिले, योजनेची नीट अंमलबजावणी झाली तर उद्याची युवा पिढी मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम होईल.
भविष्यातील भारत घडविण्याचे कार्य यातून होईल.योजनेच्या तयारीच्या अनुषंगाने या पाच जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण यंत्रणांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातही योजनेच्या यशस्वितेच्या दृष्टीने सवर्ंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे प्रतीपालकत्व योजना (फॉस्टर केअर) राबविण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यासह राज्यातील पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यात सर्वदूर माहिती पोहोचवून इच्छूक कुटुंबांचा सहभाग मिळवावा व अनाथ बालकांना सुरक्षित कुटुंब मिळवून द्यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
मोठी बातमी : शिवभक्तांनो ‘संभाजी बिडी’चे नाव बदलणार!
अमरावतीतील ‘हे’ धोरण ठरणार ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयुक्त
कंगणाने तिची लढाई पाकिस्तान नावाशिवाय लढावी,पाकिस्तानी पत्रकाराचा कंगणाला सल्ला

