पुणे : गेली कित्येक दशके महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात अखंड महाराष्ट्रासह देशाचे ऊर्जास्रोत असलेल्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विकली जात आहे. या बिडीच्या पॅकेटवर महाराजांचे फोटो देखील होता. बिडीच्या उद्योजकांविरोधात याआधी देखील शिवभक्तांकडून आवाज उठवला जात होता.
यानंतर अचानक होणारे नुकसान टाळण्यासाठी फोटो व नाव काही काळाने बदलण्याचे आश्वासन साबळे-वाघिरे ग्रुपकडून देण्यात आले होते. मात्र तरीही या बिडीचे उत्पादन व विक्री ‘संभाजी बिडी’ या नावाने सुरूच राहिले.
आता, गेले २ दिवस हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली यासह अनेक राजकीय नेत्यांनी देखील समाजमाध्यमातून या विरोधात आवाज उठवला. संभाजी महाराजांच्या नावाने व्यसनी पदार्थ विकणे उद्योजकांना भोवले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता, शिवभक्तांच्या मागणीला यश आले आहे.
‘संभाजी बिडी’चे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. या बिडीचे उत्पादन करणाऱ्या साबळे-वाघिरे ग्रुपने नाव बदलणार असल्याचे सांगितले. तर, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना निषेधार्ह असून या बिडीच्या उत्पादनावर लवकरात लवकर बंदी यावी अशी मागणी करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या:-
कंगणाने तिची लढाई पाकिस्तान नावाशिवाय लढावी,पाकिस्तानी पत्रकाराचा कंगणाला सल्ला
अमरावतीतील ‘हे’ धोरण ठरणार ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयुक्त
मोठी बातमी : कंगनावर बोलण्यास आता संजय राऊतांचा नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

