Share

जैविक कचऱ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात! प्रदुषण मंडळाने लक्ष देण्याची मागणी

Published On: 

औरंगाबाद : सध्या संपुर्ण देश कोरोनासह विविध संसर्गजन्य आजाराने पछाडलेले असतांना शहरात विविध रुग्णालयातील जैविक कचरा थेट उघड्यावर टाकण्यात येत असल्याने नव्याने नवे आजारा उद्भवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याकडे प्रदुषण मंडळाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पैठण शहरातील बहुतेक सर्वच खाजगी रुग्णालय विविध मौसमी आजाराने हाऊसपुâल्ल असुन शहरात एक खाजगी कोरोना केअर सेंटर असून एक शासकीय कोरोना केअर सेंटर शहरात आहे. असे असतांना शहरातील रुग्णालय चालवत असलेले डॉक्टर्स आपल्या दवाखान्यातील जैविक कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट न लावता रुग्णालयातील कचरा थेट रस्त्याच्याकडेला टाकुन देत आहे.

प्रदुषण मंडळाच्या निकषानुसार पैठण शहरातील सर्वच दवाखान्याची नोंद औरंगाबाद महापालिकेकडे करुन आठवड्याच्या ठराविक दिवशी हा कचरा विशेष वाहानाने प्रशिक्षित कर्मचा-यां मार्फत उचलण्यात येतो. मात्र स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर्स असे न करता सरळ हा जैविक कचरा रस्त्याच्याकडेला टाकुन देतात तर काही पेटवून देतात पण हे दोन्ही प्रोयोग मानवी जीवीतासाठी अत्यंत घातक असे आहे. या बाबत प्रदुषण मंडळ तथा नगरपरीषदेने योग्य खबरदारी घेऊन दोषी रुग्णालय व डॉक्टर्सवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!