Share

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी अध्यादेश; छगन भुजबळांचा नागरी सत्कार

Published On: 

🕒 1 min read

बीड : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणास संरक्षण दिले आहे. याबद्दल महाविकास आघाडी सरकार आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड येथे शनिवारी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री धनंजय मुंडे राहतील. तर आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, संजय दौंड, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित राहतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले होते. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून संरक्षण दिल्याने ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढल्याबद्दल बीड येथे मंत्री छगन भुजबळ, महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!