पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली आहे. या प्रश्नाबाबत बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यास तत्काळ मंजुरी दिल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करतो असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बुधवारी मंत्रालयात आदरणीय अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली होती. या वेळी आदरणीय अजितदादांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनास पुढील आठवडाभरात राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा शब्दही दिला होता. परंतु, शब्द दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी आदरणीय अजितदादांनी हा प्रश्न मार्गी लावला असून, महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे.
अजितदादा पवार हे केवळ शब्द देणारे, आश्वासन देणारे नेते नसून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेते आहेत. त्यांचा शब्द म्हणजे, आपले काम होणारच याची प्रचिती पुन्हा एकदा आली. त्याबद्दल, अजितदादा पवार यांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी शहराध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो असं प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरडी कोसळण्याच्या जागांचा शोध घेण्यासाठी नव्या समितीचे कागदी घोडे नाचवू नका’
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल – पाटील
- मोदींचा वाढदिवस युथ कॉंग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार
- ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन
- साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

