टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचं चित्र आहे. ळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचं काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे.
शेतकऱ्यांचा संघर्ष ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं बेताल वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे. दरम्यान राधामोहन सिंह यांच्या या बेताल वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. सिंह यांचे विधान ऐकल्यास हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती असंवेदनशील आहे हे लक्षात येईल. ही असंवेदनशीलताच शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडतेय अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
या सरकारच्या काळातच शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला. त्यांनी नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढला. आता तिसऱ्यांदा शेतकरी आंदोलन करतोय. @RadhamohanBJP यांचे विधान ऐकल्यास हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती असंवेदनशील आहे हे लक्षात येईल. ही असंवेदनशीलताच शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडतेय. https://t.co/KJgc1SSNlf
— Supriya Sule (@supriya_sule) June 2, 2018
वृत्तपत्रांचे मथळे मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात असे म्हणतात भारताचे कृषी मंत्री श्री. राधामोहन सिंग.
संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच काम नाही असे म्हणतात हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मोनोहर लाल खत्तर.
सांगा आता यांचे काय करायचे?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 2, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

