Share

बाईक खरेदीची संधी ! बजाज देत आहे ‘या’ दोन गाड्यांवर आकर्षक ऑफर्स, डिस्काउंट्स

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात वाहन खरेदीवर भरघोस सूट दिली जाते. मात्र यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळामध्ये उद्योग व्यवसायांन आर्थिक फटका बसला त्यामुळे वाहन उद्योग देखील मानाडवला होता. तर अनलॉक प्रक्रीये दरम्यान हळूहळू अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन उद्योग त्याचबरोबर वाहन खरेदी देखील होत आहे. सणासुदीच्या काळात विविध कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणल्या होत्या. अनेक ऑफर्स, डिस्काउंट्स असल्याने, फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी करतात. आता पुन्हा एकदा गाडी ऑफर्समध्ये गाडी खरेदी करण्याची संधी आहे.

तर अनेकदा कंपन्या जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपन्या विविध ऑफर्स देत असतात. 2020 मध्ये कोरोनाच्या संकटात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून आता विविध ऑफर्सच्या मदतीने हा जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यविविध ऑफर्सच्या मदतीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बजाजने देखील आपल्या प्लॅटिना आणि पल्सर या दोन गाड्यांवर ऑफर्स दिल्या आहेत.

बजाजने आपल्या नवीन पल्सर 125 या मॉडेलवर भरघोस सूट दिली आहे. कंपनीने चार पल्सर मॉडेलपैकी 125 या मॉडेलवर कॅश डिस्काउंट दिला आहे. पल्सर 125 चे चार मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध असून यात, सिंगल सिट ड्रम, स्प्लीट सिट ड्रम, सिंगल सिट डिस्क, स्लीट सिट डिस्क या मॉडेलचा समावेश आहे. यामध्ये केवळ ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक वेरिएंटवर डिस्काउंट मिळणार आहे. यात 2 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार असून, केवळ 12,725 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता.

बजाजच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या बजाज प्लॅटिना या गाडीवर मोठी सूट आहे. या गाडीच्या प्लॅटिना 100 आणि प्लॅटिना 110 एच-गिअर या दोन्ही वेरिएंटवर कॅश डिस्काउंट मिळतो आहे. यात बजाज प्लॅटिना 100 वर 2800 रुपये तर प्लॅटिना 110 एच-गिअर वर 2500 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे. या गाडीवर 5 वर्षाची गॅरंटीही मिळणार आहे. सध्या या गाडीची किंमत देखील इतर गाड्यांच्या तुलनेत कमी आहे. प्लॅटिना 100 ची किंमत 58,605 रुपये, तर प्लॅटिना110 H-Gear या किंमत 63,027 रुपये आहे. त्यामुळे आता बाईक रायडर्स साठी अनेक ऑफर्स, डिस्काउंट्स मध्ये या बाईक खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!